किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– किसान वार्ड राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यात अध्यक्षपदी मंजुषा संजय शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी मंगला महेश खोके यांची निवड करण्यात आली. सचिवपदी मंगला विनोद घाटे, सहसचिवपदी निमा किशोर शेंडे यांची तर सदस्य म्हणून अनिता लांजेवार, चंद्रभागा कुंभरे, कांताबाई वांढरे, मंजुषा गोरे, भाग्यश्री कुरवटकर आदींची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, महिला शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षा संगीता मोहुर्ले, ज्योती रामचंद्र शेंडे, शहराध्यक्ष अशोक राव, उमेश गोरे, ॲड चंद्रशेखर चांदेकर यासह किसान वार्ड येथील अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *