Home
Home राजुरा राजुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ पुतळा परिसराचा होणार कायापालट! 🚩आमदार देवराव भोंगळे...

राजुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ पुतळा परिसराचा होणार कायापालट! 🚩आमदार देवराव भोंगळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४५ लक्ष रुपये मंजूर

लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती

राजुरा, दि. ११ : राजुरा शहरातील मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येणार आहे. स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी तब्बल ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शहरात प्रवेश करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. या ठिकाणाचे ऐतिहासिक व भावनिक महत्त्व लक्षात घेऊन परिसराचे सुशोभीकरण करण्याची गरज ओळखण्यात आली होती. त्यानुसार आमदार देवराव भोंगळे यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला.

याबाबत बोलताना आमदार भोंगळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या प्रेरणास्थळाचे दर्शन घडते. या परिसराचे पावित्र्य जपत त्याचे सौंदर्यीकरण करणे हे माझे कर्तव्य आहे. राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”

या सौंदर्यीकरणाच्या कामामुळे राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः शिवप्रेमींनी आमदार देवराव भोंगळे यांच्या या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here