लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा : रोटरी क्लब ऑफ राजुराच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित ‘रोटरी उत्सव २०२६’चा दि. ९ एप्रिल रोजी उत्साहात शुभारंभ झाला होता. या उत्सवानिमित्त ९ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
रोटरी उत्सवाच्या माध्यमातून राजुरा शहरात विविध कलागुणांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली. शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद लुटला.
उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.आमदार देवराव भोंगळे यामध्ये पत्नी सौ. अर्चनासह , राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपाचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडाणीया, शहर महामंत्री सचिन भोयर, विनोद नरेंदुलवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल चांडक, राजू गोखरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, नगरसेवक भूपेश मेश्राम, मयुरी पहानपटे, पूनम गिरसावळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, अभिषेक गंपावार, नवल झंवर, मंगेश श्रीराम, श्रीकृष्ण गोरे, बि.यू. बोर्डेवार, अनिल बाळसराफ, सागर भटपल्लीवार, बादल बेले, मयूर बोनगीरवार, सारंग गिरसावळे, हरजित सिंग, अनंत ताजने, एजाज अहमद, अमजद खान, आनंद मोहरील, अमोल कोंडावार, किरण ढुमणे, समीर चिल्लावार, डॉ. अमोघ कल्लूवार, राहुल रासेकर, केतन जुनघरी, अहमद शेख, आनंद चांडक, ॲड. जीवन इंगोले, विवेक राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवामुळे राजुरा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांना विविध कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेता आला.





