Home
Home गडचांदूर / कोरपणा राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकुरवार यांचा शिवसेनेला रामराम

राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकुरवार यांचा शिवसेनेला रामराम

गडचांदूर 👉प्रतिनिधी

गडचांदूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा प्राथमिक सदस्य असलेले श्री. सागर सुरेशराव ठाकुरवार यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र त्यांनी जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिरहे यांच्याकडे सादर केले आहे.

दिनांक ३० मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रात ठाकुरवार यांनी वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे. पक्षाने आजपर्यंत दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले असून, “जय महाराष्ट्र” असा उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावणारे सागर ठाकुरवार यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्राची प्रत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख प्रशांत कदम तसेच आमदार संजय देओकर यांनाही पाठविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here