Home
Home चंद्रपूर आकाशवाणी चंद्रपूरच्या ‘कृषिवाणी’ कार्यक्रमात मत्स्यपालन उद्योजक सतीश बेतावर यांची मुलाखत

आकाशवाणी चंद्रपूरच्या ‘कृषिवाणी’ कार्यक्रमात मत्स्यपालन उद्योजक सतीश बेतावर यांची मुलाखत

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर, दि. ९ जून २०२६ : आकाशवाणी चंद्रपूरच्या लोकप्रिय ‘कृषिवाणी’ कार्यक्रमांतर्गत आज सायंकाळी ७.३० वाजता मत्स्यपालन आणि मत्स्यबीज निर्मिती व्यवसायात यशस्वी वाटचाल करणारे गडचांदूर येथील युवा उद्योजक सतीश बेतावर यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

या मुलाखतीत सतीश बेतावर यांनी मत्स्यपालन व्यवसायातील संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्यबीज निर्मितीची प्रक्रिया तसेच ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याशी संवाद गौरी गोवाडे यांनी साधला असून कार्यक्रमाचे सादरीकरण उमेश दुपारे यांनी केले आहे.

मत्स्यपालन क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवश्यक नियोजन, शासकीय योजनांचा लाभ आणि व्यवसायातील आव्हानांवर मात करण्यासाठीचे अनुभव या मुलाखतीतून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.

हा कार्यक्रम आज, मंगळवार दि. ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता १०३ मेगाहर्ट्झ एफएम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर प्रसारित होणार आहे. मत्स्यपालन आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये रस असलेल्या शेतकरी, उद्योजक आणि युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here