Home
Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर

लोकदर्शन चंद्रपूर 👉 अशोककुमार भगत

चंद्रपूर, दि. ७ जून २०२६ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूर (नोंदणी क्र. F-12892 (चं.)) यांच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली असून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ॲड. संजय रतनसिंग निरंजने, उपाध्यक्षपदी ॲड. प्रशांत हरिदास गोंगले, सचिवपदी ॲड. कपिल प्रकाश नंदेश्वर तर कोषाध्यक्षपदी ॲड. जगदीप विश्वनाथ खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कार्यकारी सदस्य म्हणून ॲड. पुनमचंद दादाजी वाकडे, ॲड. भिमराव संतोष रामटेके, ॲड. खुशाल माधव खोब्रागडे, ॲड. कपिल आनंद भगत, ॲड. अवधूत दौलतराव मांगे, ॲड. अशोक ऋषीनी बारसागडे आणि ॲड. शेषराव वातुजी रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासह वकिलांच्या हितासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. राजेश एन. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल कायदे क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here