लोकदर्शन कोरपना 👉शिवाजी सेलोकर
कोरपना येथील राम मंदिरात भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल विशेष महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाचा विकास, सुशासन आणि जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून यशस्वीपणे कारभार चालविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे तसेच देशाची प्रगती अधिक वेगाने व्हावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मनोगतात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, गरीब कल्याण आणि भारताची जागतिक स्तरावरील वाढती प्रतिष्ठा यांचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
महाआरतीनंतर उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष संजय मुसळे ,महिला तालुकाध्यक्ष सौ स्मिता ताई चिताडे अलकाताई रणदिवे, ,तालुका महामंत्री सतीश उपलेंचीवार, शहराध्यक्ष अमोल आ से कर महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश खडसे, नगरसेवक किशोर बावणे ,ज्येष्ठ नेते शिवाजी सेलोकर,शशिकांत अडकिने ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवन बुरेवार, दिनेश ढेंगळे, अँड पवन मोहितकर, इंदिरा ताई कोल्हे, धम्म कीर्ती कापसे, मंगेश तिखट,
अभय डोहे, सत्यवान घोटेकर, पुंडलिक उलमाले शंकर चिंतलवार ,विजय पानघाटे, उमेश पालीवाल ,संतोष बोरडे ,संजय पिंपळशेडे, कार्तिक बोनलावर, सचिन देरकर, पुजारी गंगाधर गिरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





