लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
गडचांदूर, दि. १० जून २०२६ :
देशाच्या विकासाला नवी दिशा देत जागतिक पटलावर भारताचा गौरव उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा करण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल गडचांदूर येथील साई मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआरती, मंगल प्रार्थना तसेच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी तसेच जनकल्याणासाठी प्रार्थना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी मोदी यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रम सायंकाळी साडे सहा वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहराध्यक्ष अरविंद डोहे व पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसभर कार्यकर्ते आणि नागरिकांशी संपर्क साधून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने साई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले आणि महाआरतीचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती, देशाची वाढलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा, पायाभूत सुविधा विकास, जनकल्याणकारी योजना आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने झालेल्या वाटचालीचा गौरव केला. जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थिर नेतृत्व देत देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या मोदी यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.
या कार्यक्रमास शहराध्यक्ष अरविंद डोहे, कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेचवार, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, कोरपना तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. स्मिताताई चिंताडे , शहर कोषाध्यक्ष सौ. अपर्णाताई उपलेचवार, भाजप चे वरिष्ठ नेते शिवाजी सेलोकर शहर युवा अध्यक्ष विवेकानंद उरकुडे, उपाध्यक्ष अरविंद कोरे, मोहन भारती, व्यापारी शहर संयोजक विश्वंभर झाम, शिवाजी शेलोकर, सुरज पांडे, सुरेश मेश्राम, मेहताब सर, वीरेंद्र भिसे, देवराव विधाते, देविदास पेंदोर, जयंता भोंगळे, विवेक भेडोलकर, योगेश बांधूरकर, सोमेश्वर सोनकांबळे, विठ्ठल धांडे, विनोद इंगळे, शाकीर भाई, सोमवंशी ठेकेदार, गणपत बुरटकर, गणेश आदे, तुषार देवकर, दत्तात्रय जगताप, प्रवीण सतफाडे तसेच सौ. उमाताई चिंताळे, सौ. जयाताई लोहे, सौ. आशाताई वाघमारे, सौ. सुंदराताई दाळे, सौ. शालिकाताई बेले, सौ. बुरटकर ताई, सौ. रंजनाताई मडावी, सौ. किरणताई उईके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती करण्यात आली व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले
गडचांदूर येथील साई मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा केल्याबद्दल आयोजित महाआरती, मंगल प्रार्थना व प्रसाद वाटप कार्यक्रमात उपस्थित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक. 📸🇮🇳🙏🏻





