Home
Home गडचांदूर / कोरपणा मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी वाटचालीस सलाम; गडचांदूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी वाटचालीस सलाम; गडचांदूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षपूर्तीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, गडचांदूर मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला तसेच पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रसेवा, समाजकार्य आणि जनकल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास भाजप गडचांदूर मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद डोहे, कोरपना तालुका महामंत्री श्री. सतीश उपलेंचवार, संयोजक तथा शहर महामंत्री श्री. सतीश बेतावार, सहसंयोजक श्री. गणेश आदे, महामंत्री श्री. महेश घरोटे, श्री. हरी घोरे, उपाध्यक्ष श्री. अरविंद कोरे, चिटणीस श्री. रमेश चुदरी, श्री. जयंता भोंगळे, श्री. सोमेश्वर सोनकांबळे, नगरसेवक श्री. सुरज पांडे, श्री. सुरेश मेश्राम, नगरसेविका सौ. कीर्ती वैरागडे, सौ. सपना शेलोकर, सौ. संगीता गाऊत्रे, कोरपना तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रा. स्मिताताई चिताडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. विवेकानंद उरकुडे, श्री. विठ्ठल धांडे, श्री. शाकीर भाई, श्री. बबलू रासेकर, श्री. गणपत बुरटकर, श्री. नागेश रोहणे, श्री. सचिन चुरे, श्री. विकी घोरे, श्री. धवल घोरे, श्री. नारायण सोनटक्के तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विकासाभिमुख, जनकल्याणकारी आणि राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांचा गौरव केला. देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करत उपस्थितांनी “विकसित भारत” संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.

उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीला आणि शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here