लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना : भारतीय जनता पार्टी, राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026 अंतर्गत कोरपना ग्रामस्तरीय मंडळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग 11 व 12 एप्रिल 2026 रोजी गडचांदूर येथील बालाजी सिलेब्रेशन हॉल येथे पार पडणार आहे.
या प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी (11 एप्रिल) उद्घाटन सत्र, संघटनात्मक कार्यपद्धती, वैचारिक अधिवेशन तसेच ‘जनसंघ ते भाजप इतिहास व विकास’ या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या सत्रांमध्ये श्री. संकेत भानारकर, श्री. संजय गंगुडे आणि श्री. हरीश शर्मा हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी प्रशिक्षण, संवाद सत्र आणि मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी (12 एप्रिल) सकाळी जागरण, शाखा व योग यानंतर बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बूथ प्रवर्तन/आपली कार्यपद्धती’ या विषयावर श्री. विवेक कोटे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना आणि सरकारी कामगिरी यावर मा. आमदार देवरा भोंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर समारोप सत्र होऊन भोजन व प्रस्थान करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी आवश्यक साहित्य तसेच पेन व वही सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा प्रशिक्षण वर्ग कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.





