Home
Home गडचांदूर / कोरपणा “गडचांदूर येथे नारी शक्ती वंदनासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा”

“गडचांदूर येथे नारी शक्ती वंदनासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा”

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती

राजुरा विधानसभा क्षेत्रात नारी शक्ती वंदन अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी गडचांदूर येथे महिलांचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग राहणार असून, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून
देवराव दादा भोंगळे (राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार) यांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच कार्यक्रमास
अलकाताई अत्राम (प्रदेश महामंत्री),
वंदनाताई शेंडे (जिल्हाध्यक्ष),
सतीशभाऊ उपलंचिवार (तालुका महामंत्री),
अरुणभाऊ डोहे (शहराध्यक्ष)
आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, या आक्रोश मोर्चात अधिकाधिक महिलांचा सहभाग सुनिश्चित करावा. सर्व महिलांनी सायंकाळी 5 वाजता बीजेपी कार्यालय, सुधीरभाऊ सेवा केंद्र येथे उपस्थित राहावे.

नारी शक्ती वंदनाच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचा आणि त्यांच्या सन्मानासाठी एकजुटीने पुढे येण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here