Home
Home मुंबई मुंबईत भाजपा आयोजित ‘जन आक्रोश महिला संमेलन’ उत्साहात पार वरळी...

मुंबईत भाजपा आयोजित ‘जन आक्रोश महिला संमेलन’ उत्साहात पार वरळी डोम, जांबोरी मैदान, मुंबई | 📆 २१-०४-२०२६

लोकदर्शन मुंबई 👉मोहन भारती

मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबईतील NSCI डोम, वरळी येथे आज ‘जन आक्रोश महिला संमेलन’ उत्साहात पार पडले. या संमेलनाला राज्यभरातून महिला भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

कार्यक्रमास उपस्थित राहून काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा देशातील कोट्यवधी माता-भगिनींच्या सन्मानाचा आणि सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. मात्र काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांनी या विधेयकाला विरोध करून महिला आरक्षणाला अडथळा निर्माण केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या संमेलनात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच महिला सशक्तीकरणासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या वेळी प्रदेशातील वरिष्ठ नेते, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here