Home
Home मुंबई राजुरा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा

राजुरा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा

लोकदर्शन मुंबई 👉मोहन भारती

मुंबई : कॅबिनेट बैठकीच्या निमित्ताने मुंबई येथे उपस्थित असताना राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीत राजुरा मतदारसंघातील विकासकामे, महसूल विभागाशी संबंधित मुद्दे तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर सकारात्मक संवाद झाला. संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

या चर्चेमुळे मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here