लोकदर्शन गडचांदूर 👉 (मोहन भारती,
चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येची दखल घेत आमदार देवराव भोंगळे व माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट (जुनी माणिकगड सिमेंट) कंपनीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदया यांनी सिमेंट उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी, आरोग्यविषयक अडचणी आणि दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम जाणून घेतले. औद्योगिक विकास महत्त्वाचा असला तरी तो स्थानिकांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या किंमतीवर होऊ नये, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी संबंधित विभागांना प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या.
“प्रदूषणमुक्त परिसर आणि निरोगी जनजीवन हेच आमचे ध्येय असून, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासनही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक प्रतिनिधी, महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
त्यामध्ये जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, नगरसेवक सतीश बेतावार, हिमांशू नामवाड, स्मिता चिताडे, विजयालक्ष्मी डोहे, शितल धोटे, किर्ती वैरागडे, सपना सेलोकर, अरुण रागीट, हरी घोरे, विक्की उरकुडे, विश्वंभर झाम, सुरेश मेश्राम, सुरज पांडे, संगीता गाऊत्रे आदींचा समावेश होता.
या दौऱ्यामुळे गडचांदूर परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





