Home
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूरमध्ये रस्ते सुरक्षेसाठी पुढाकार : सतीशभाऊ उपलेंचवार यांच्या प्रयत्नातून गतिरोधकांची उभारणी

गडचांदूरमध्ये रस्ते सुरक्षेसाठी पुढाकार : सतीशभाऊ उपलेंचवार यांच्या प्रयत्नातून गतिरोधकांची उभारणी

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर – गडचांदूर येथील परमडोली रोडवरील पेट्रोल पंप चौक ते मानिकगढ गेट दरम्यान स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वारंवार दुचाकी अपघात होत होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा तालुका महामंत्री सतीशभाऊ गणपतराव उपलेंचवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन सादर करून ठोस पाठपुरावा केला.

या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ सकारात्मक पाऊल उचलत आज या मार्गावर पेंटद्वारे गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तयार केले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यास मदत होऊन अपघातांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही रस्ते सुरक्षेसाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सतीशभाऊ उपलेंचवार यांचे तसेच तत्परतेने कार्यवाही करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here