विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत करण जुनघरी यांची निवड

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती

करणच्या यशाबद्दल अनेकांकडून होत आहे कौतुक.

राजुरा :– विदर्भ हौशी असोसिएशन द्वारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विदर्भस्तरीय निवड चाचणीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत विविध जिल्ह्यातील १९ खेळाडूंची निवड करण्यात आली असून यात राजुरा तालुक्यातून गोवरी येथील करण हरिश्चंद्र जुनघरी (२०) याची मातोश्री नेर, यवतमाळ पुरुष संघात एकमेव निवड करण्यात आली आहे.
करण जुनघरी हा गोवरी चे प्रतिष्ठित नागरिक हरिश्चंद्र जुनघरी यांचा मुलगा असून तो शालेय वयापासूनच खेळात उत्तम काम गिरी करीत आला आहे. त्याच्या या निवडीबद्दल करणचे आई वडील, मार्गदर्शक सत्यवान कुळसंगे, रमेश लोहे, संजय जुनघरी, दिलीप जुनघरी, श्रीधर जुनघरी, प्रमोद लांडे, प्रकाश काळे, ग्राम पंचायत चेतन गोंडे, पिंपळकर, शंकर मादनेलवार, शुभम श्रीनू जुनघरी, भूषण जुनघरी, केतन बोभाटे, कुणाल जुनघरी व गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *