2 डिसेंबर ला चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शनी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, चंद्रपूर च्या वतीने एक दिवसीय तंत्र प्रदर्शनी चे आयोजन 2 डिसेंबर ला सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची ,जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ,चंद्रपूर येथे करण्यात आले आहेत.
जिल्हा स्तरीय प्रदर्शनी चे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कल्पना खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली एम आय डी सी चंद्रपूर चे चेअरमन मधुसूदन रुंगठा यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे चेअरमन पी एस आंबटकर,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर चे सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे राहतील.
जिल्हा स्तरावर आयोजित तंत्र प्रदर्शनी मध्ये जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तसेच एम सी व्ही सी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिकृती सादर करणार आहेत, या प्रदर्शनीत विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समिती ने केले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *