



लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात
शारीरिक हतबलता काय असते हे यांच्याकडे पाहून समजते. सासूबाईंचा 80वर्षांपूर्वी वयाच्या पाचव्या वर्षी बालविवाह झाला. त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. थोडा सासरवास,कमाईचा कोणताही मार्ग न्हवता. नवऱ्याचं शिक्षण करण्यासाठी सासू बरोबर शेतात काम तर कधी मजुरी करुन एम. ए. एम. एड. केले. त्यांना शिक्षक, मुख्याध्यापक बनवण्यात मोठा हातभार लावला. सत्तरच्या दशकात लातुर सारख्या ठिकाणी गंजगोलाई लगत डालडा फॅक्टरी जवळ 12एकर शेती घेतली. प्लॉटिंग केले. श्रीकृष्ण नगर लातुर ही त्यांची देण. सत्तरच्या दशकात अशी डेरिंग करणं खुप जोखमीचे होते. पन्नास वर्षांपूर्वी हा नविन प्रयोग होता.
यात त्यांना यश आले. त्यातुन वडजी आमच्या गावी वडजी ते तेरखेडा दुसऱ्याच्या शेतात पाऊल ठेवण्याची गरज नाही एवढी जमीन घेतली. नवऱ्याला शिकवले पण त्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही परंतु शेती घेतल्या नंतर चाळीस वर्षे शेती केली. तीन विहिरी, दोन तलाव केले. चिरबंदी वाडा बांधला. घर आणि विहीर बांधून बघावी म्हणजे कळतं असं म्हणतात. त्याकाळी पोकलेन न्हवते. ठिकाव खोर आणि माणसाच्या सहाय्याने खोदणे खुपच अवघड होते. तरीही तीन विहिरी खोदून संपूर्ण शेती बागायती केली.
कष्ट आणि जिद्द याचा कहर त्यांनी दोन पाझर तलाव बांधले. हा एक चमत्कार होता. गावाच्या पश्चिमेस 25एकर डोंगर विकत घेतला. 72 चा दुष्काळ पडला. लोकांना कामे न्हवती म्हणुन नवऱ्याची दूरदृष्टी व त्यांचे कष्ट आणि जिद्द व लोकांना रोजगार द्यायचा म्हणून तलाव करायला सुरवात केली. अख्या शेतातील दगड गोळा करुन खोरीवर दगड व मातीचा बंधारा घालायचे काम केले. वडजी, नांदगाव, दिंडोरी, खानापूर, चुंब गावातील अनेक लोक रोजाने येत. पारा,टीकाव,खोऱ्याने हा तलाव बांधला. हे काम चार ते पाच वर्षे चालले. हा बंधारा पाझरत असे पाणी टिकत नसे म्हणुन त्याच्या वरी नऊशे मीटर वर दुसरा पाझर तलाव केला. आणि वीस एकर मध्ये हळदीचे पीक घेऊन संपूर्ण क्षेत्र बागायती केले. लोकांना रोजगार दिला. त्या काळात गड्याला दोन रुपये व बाईला एक रुपया मजुरी होती. अशी ही जिद्दी वाघीण आज उतार वयाकडे आहे. कार्याची गाथा ऐकताना कोणालाही नक्कीच अभिमान वाटेल. नवनाथ बाग करते त्याचा त्यांना अभिमान वाटतो. मुक्ताई त्यांच्या आईचे नाव. वृद्धाश्रमाचे काम थांबले होते. बांधकाम संपले होते. टॉयलेट बाथरूम झाले न्हवते. नवऱ्याची पेन्शन मिळते त्यातील साठलेले पन्नास हजार रुपये काढून टॉयलेट बांधण्यासाठी दिले. माझ्या नजरेतून त्या टॉयलेटला मंदिरा एवढेच महत्व आहे.
मध्ये त्या पडल्या. सर्व गावाला आणि त्यांना स्वतःला आत्ता जगणार नाही असे वाटत होते. त्यांना पुण्याला घेऊन गेले. ऑपरेशन नंतर त्यांना बेड सोर झाले होते. वजन असल्यामुळे हलता येत न्हवते.गावात लोक प्रेमाने लोक यायचे रडायचे पण नेमके काय करायचे कळत नसायचे. पुण्याला घेऊन जात असताना अंगावरील कपडे दुखण्यात कपडे बदलले नसल्याने वास सुटला होता. जामखेड मध्ये दोन गाऊन घेतले. पुढे जाऊन गाडीतच गाऊन घातला व साडी कपडे फेकून दिले. गाऊन घालायची वेळ आली म्हणून त्यांना रडू कोसळलं. पुण्यात गेल्यावर चोवीस तासासाठी तीन बायका लावल्या. औषधं, अंघोळ व जेवणाकडे स्वतः लक्ष दिले. त्यातून आज बऱ्या झाल्या त्यांचे आयुष्य वाढले. वृद्धाप काळ किती खडतर असतो हे डोळ्याने जवळून पाहिले. लक्ष दिले नसते तर कदाचित त्या आज जगात नसत्या. गेली पंधरा वर्षे सामाजिक काम करत असताना अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक बाल आश्रम, वृध्द आश्रम, महिला आश्रम पाहिले. तेंव्हा हे लक्षात आले की मुलं सांभाळत नाही म्हणून वृद्धाश्रम लागतात त्यापेक्षा ज्यांना मुलगा मुलगी नाही त्यांना याची किती गरज आहे हे पाहिले. आणि म्हणूनच मुक्ताई वृद्धाश्रम संकल्पना अमलात आणत आहे. नवनाथ बाग ही संकल्पना जरी माझी असली तरी मुक्ताई वृद्धाश्रमाच्या खऱ्या डायरेक्टर रुख्मिणी मोराळे याच आहेत.
स्वातीताई मोराळे (8485883863whup )
डायरेक्टर :नवनाथ बाग!
कृषी, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक प्रकल्प!!!
पत्ता :नांदगाव (वडजी ), तुळजापूर शिर्डी मार्ग, ता. वाशी
जि. उस्मानाबाद!!!