



लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी:👉 महेश कदम
संजीवंनी मल्टिस्पॅसिलिटी रूग्णालय पेण यांच्या सहकार्याने ग्रृप ग्रामपंचायत पडवी येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. पोटांचे विकार, दातांचे विकार, श्वसनाचे विकार, किडनीचे विकार, सांध्याचे विकार, मणक्याचे विकार, मूत्राशयाचे विकार, गर्भाशयाचे विकार, हृदयरोग, संधिवात, त्वचारोग, नेत्ररोग, निरो सर्जरी, कान नाक घसा, आम्लपित्त,आमवात अशा आजारांवर शिबिरामध्ये रुग्णांवर तपासण्या करण्यात आले. शिबीरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून १५० पेक्षा आधिक रूग्णानी याचा लाभ घेतला. सदरचे शिबीर वैभव साळूंके, राकेश तांदलेकर, सिताराम साळूंके, अंकूश साळूंके व जे.जे. हॉस्पिटल मधील चंद्रकात साळूंके या सर्वाच्या प्रयत्नाने आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी झाले.