जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मध्ये “संविधान दिन” साजरा.

लोकदर्शन 👉.विठ्ठल ममताबादे

उरण दि 27.नोव्हेंबर 2022
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मध्ये “संविधान दिन” साजरा करण्यात आला.यावेळी जयवंत ढवळे मुख्य मॅनेजर, गिरीश थॉमस , जेएनपीए विश्वस्त दिनेश पाटील व विश्वस्त रवी पाटील, माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम संविधान प्रस्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाची सविस्तर माहिती जयवंत ढवळे व भूषण पाटील यांनी दिली. 75 वर्षांपासून भारत देश एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे व संविधाना मध्ये सामाजिक, आर्थिक व राजनीतीक समता सांगितले असून सर्वांनी संविधानचे प्रसार ,प्रचार व संरक्षण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी जेएनपीएचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *