Home
Home Breaking News वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

 

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील मुख्य रस्त्यावरुन विद्यार्थीची संविधान रँली काढुन येथील आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्याध्यापक एस. डि.भोकरे, प्रविण क्षीरसागर यांनी पुजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारतीय संविधानाचे वाचन जि.एम कावळे यांनी केले व संविधान दिन उत्साहात साजरा केला. यावेळी डि.आर. नाईकनवरे, बि.व्हि. बुधवंत यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. यावेळी मुख्याध्यापक एस. डि.भोकरे, प्रविण क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बि.बि.मोरे यांनी केले तर आभार व्हि.एन. बोंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि आर.बि.राठोड, एम.एस. गिरी, एस.ए. महाडिक, जि.आर. मळी, जे.बि.शिंदे ,उमाकांत क्षीरसागर यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here