श्यामादादा कोलाम सामान्यांसाठी संघर्ष करणारा जननायक. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

श्यामादादा कोलाम यांच्या पुतळ्याचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते अनावरण.

जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा सीतागुडा ग्राम पंचायत पाटण येथे श्यामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त श्यामादादा कोलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कोलाम समाजात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या गरिबांचा नेता विदर्भाचे रॉबीन हुड श्यामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्ताने मौजा सितागुडा येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थित पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच श्यामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त येथे ५५ किलो वजनी गटात भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. कबड्डी सामन्याचे उद्घाटनही आ. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. श्यामादादा कोलाम यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी आहे. त्यांनी त्या काळात ब्रिटिश सरकार, देशी धनदांडगे सावकार, रझाकार अशा सर्व शत्रुंशी एकाकी झुंज देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पद्धतीने संघर्ष केला. अनेकांची मदत केली. श्यामादादा ची ख्याती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेले होते म्हणूनच त्यांना जनतेने भरभरून प्रेम दिले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील मडावी, प्रमुख अतिथी सरपंच सिताराम मडावी, उपसरपंच गणेश शेटकर, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष महिला नंदाताई मुसने, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, माजी सभापती शंकर सिडाम, तुकाराम सिडाम, गाव पाटील भिमराव आत्राम, नगरसेवक मारोती बेलेवाड, माजी उपसरपंच भीमराव पवार, सरपंच जंगू पा येडमे, शामराव कोडापे, नैना शिंदे, उपसरपंच निर्मला मदेवाड, अशफाक शेख, माधव डोईफोडे, सुग्रीव गोतावाळे, मारू आत्राम, प्रभाकर उईके, ग्रामपंचायत सदस्य वागुजी उईके, गणेश आचारे, भिमराव सिडाम, जानुबाई उईके, विठ्ठल नैताम,गीता चव्हाण, मीराबाई उईके, आयोजन कमिटी बाबुराव आत्राम, सुभाष आत्राम, आनंदराव आत्राम, लक्ष्मण मडावी, जंगू मडावी यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच भीमराव पवार यांनी केले. प्रास्ताविक सरपंच सिताराम मडावी तर आभार प्रदर्शन उपसरपंच गणेश शेटकर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *