मुलींनी धाडसी बनावे : श्री रामटेके सर पीएसआय जिवती.*

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत

विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील समाजशास्त्र विभाग, वुमन्स एम्पॉवरमेंट सेल आणि एकात्मिक बाल विकास योजना जिल्हा चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 18 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी करिता स्व रक्षण प्रशिक्षण वर्ग च्या उद्धघाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून बोलतांना मा.श्री. रामटेके सर पोलीस सब इन्स्पेक्टर जिवती यांनी प्रतिपादन केले. समाजात घडणाऱ्या वाईट कृतीना तेव्हाच प्रत्युत्तर देणे गरजेचे असून त्याकरिता प्रत्येकाने कायद्याचे तंतोतंत पालन करून होणाऱ्या अन्यायाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविने नितांत गरजेचे आहेत. पोलिस आपले मित्र आहे याची जाणीव ठेवावी. सर्वात आधी मुलींनी आपलं मत व्यक्त करण्याचं धाडस अंगी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत आपण समाजातील वाईट कृतींना धडा शिकविणार नाही तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण कमी होणार नाही. मोबाईल पासून सुध्दा दुर राहण्याची सूचना करुन सायबर क्राईम बाबत विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांनी महिलांनी विद्यार्थिनी आपले विचार प्रगतीच्या दिशेने उत्तुंग ठेवून मार्गक्रमित जाणे आणि या दरम्यान वाईट कृत्याची भनक लागतात त्याला त्या ठिकाणी थांबविणे त्याकरिता शासनाने जी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली आहे. त्यावर परिपूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याशी संपर्क साधावा. तर एकात्मिक बाल विकास योजना च्या जिवती येतील उईके मॅडम पर्यवेक्षिका यांनी मुलींनी स्व रक्षण करण्याकरिता स्वतः तयार असणे गरजेचे आहे. त्यांनी आपली मानसिक आणि शारीरिक रित्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. असे मत मांडले. सदर प्रशिक्षण वर्गाकरिता मुख्य प्रशिक्षक म्हणून चंद्रपूर वरून आलेले श्री.राहुल बाहादे यांनी वेगवेगळे स्वरक्षणासाठी उपयोगात आणणारे प्रशिक्षण, स्वतःचा बचाव कसे करता येईल याकरिता करून दाखविले. सोबतच विद्यार्थ्यांकडून सुद्धा करून घेतले. विद्यार्थिनींनी समाजात वावरत असताना दक्ष राहून कोणत्याही हल्ल्याचं स्व रक्षण करता यायला पाहिजे व ती तयारी असायला पाहिजे असे श्री. बहादे यांनी म्हटले व वेगवेगळे बचावाचे तंत्र समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री.लांडगे तर आभार प्रा. श्री देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिसरातील आशावर्कर ताई महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *