भारतातील तमाम महिला वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनंत उपकार* *सुजाता जीवन सावंत*

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी सिद्धार्थ नगर काॅलनी नं. २येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साह व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना *सुजाता जीवन सावंत म्हणाल्या की भारतातील प्रत्येक स्री वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे अनंत उपकार आहेत त्या उपकाराचे फेड कधीही होऊ शकत नाहीत महात्मा फुले यांनी 1848 सुरू केलीली शिक्षणाची गंगा स्री शिक्षणाचे रोपटे त्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक रूप देऊन यांनी तिला राष्ट्रपती पदावर पोहोचले ह्या गौरव फक्त आणि फक्त भारतात घडू शकतो. हजार वर्षे उपेक्षित असलेले शिक्षणापासून व धनापासून वंचित असलेली भारतातील सर्व जाती धर्मातील सामान्य स्त्री बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिला मुळे दोन्ही घरची संपत्तीची मालकीण व शिक्षणाची वाघीण झाली आहे .भारतातील महिलांनी डॉक्टर बाबासाहेब *आंबेडकर व महात्मा फुले यांची* *सर्व चरित्र वाचून कर्मकांडातून* *स्वतःची सुटका* *करून घेतली पाहिजे*आज स्री सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. आहे ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांची कृपेने म्हणावे लागेल*
सिद्धार्थनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे संयुक्त जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली *यावेळी विचारपीठावर फक्त आणि फक्त महिलांना संधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आखणी सर्व महिलांनी केली*. हा हा नावीन्यपूर्ण सिद्धार्थ नगर येथे कॉलनी नंबर दोन, आटपाडी येथे महापुरुषांना मानवंदना देण्यासाठी राबवण्यात आला.
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्षा राजश्री अमर मोटे व उपस्थित मान्यवरांच्य हस्ते तथागत गौतम बुद्ध,महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन व दीप प्रज्वलन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आले.
यावेळी विचार पीठावरती माननीय रेश्मा अरूण बालटे, मा. वैशाली उत्तम बालटे कार्यक्रमाचे अध्यक्षा राजश्री अमर मोटे, मा. कविता राजेंद्र खरात, मा. उर्मिला लक्ष्मण मोटे, मा. पुनम रणजित ऐवळे डॉक्टर अनिता अमोल गायकवाड डॉक्टर किर्ती अभिजीत चंदनशिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर कौशिक कमलेश घोडके यांनी रशिया येथे एमबीबीएस केल्याबद्दल त्यांचा कॉलनीचे वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर प्रगल्भ जनार्दन सावंत तसेच डॉ नितीन शांतीलाल नेताम, तसेच इंजिनिअर मा आकाश राजेंद्र खरात तसेच इंजिनिअर अनिकेत यशवंत मोटे तसेच क्रिकेटर हर्ष मोहन खरात (इंग्लंड)तसेच पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल ऋतुजा अक्षय बनसोडे तसेच संगीत क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल संगीतकार समाधान किसन ऐवळे सर यांचाही या कॉलनीच्या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला व गुणगौरव करण्यात आला.
दिनांक 11 एप्रिल रोजी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संयुक्त जयंती उत्सवाची सुरुवात झाली. यावेळी पहिल्या *दिवशी 11 तारखेला महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी सलग तीन तास अभ्यास करून उपक्रम घेण्यात आला* *यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासाची व वाचनाची गोडी लागावी यासाठी हा उपक्रम दरवासी राबवण्यात येतो. या ठिकाणी 35 मुलांनी सहभाग नोंदवला तसेच दुसऱ्या दिवशी मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड व्हावी ,अधिकारी बनावे त्यासाठी मिनी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली* तसेच भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,धावणे स्पर्धा ,लिंबू चमचा स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा तसेच महिलांसाठी * *खेळ पैठणीचा* यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त् विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व शैक्षणिक साहित्याचे वाटप या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी आणि मा राजेंद्र खरात जिल्हाध्यक्ष आर पी आय, डॉक्टर अमोल गायकवाड तसेच डॉक्टर अभिजीत चंदनशिवे सर, विजय पवार सर ,नामदेव खरात, विशाल काटे ,जीवन सावंत सर माननीय उत्तम बालटे साहेब ,अमोल लांडगे साहेब उपस्थित होते.
मुलांना विविध स्पर्धा चे बक्षीसे मा.
दत्तात्रय पाटील(पंच) व मा. उत्तम बालटे यांनी दिली तर उपस्थित मान्य वरांसाठी भोजन मा. सचीन शंकर सावंत यांनी दिले.
तसेच यावेळी आटपाडी नगरपंचायत मधून वरिष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या मिलिंद शंकर मोरे यांचा सेवा पुर्तीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सुश्मिता सुरेश मोटे यांचा महिला आघाडी रिपाई तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा कार्यक्रमाचे संयोजन सुरेश मोटे सर, मिलिंद मोरे साहेब ,रुपेश भंडारे ,जनार्दन मोटे सर, राजेंद्र सावंत सचिन सावंत ,जनार्दन खरात ,सुष्मिता मोटेमॅडम, पूजा मोटे मॅडम, रत्नमाला सावंत मॅडम इत्यादींनी केले
जयंती महोत्सवाचे व्यवस्थापन चैतन्य मोटे, शुक्षृत लोंढे ,अनिकेत मोटे, सिद्धांत मोटे, ऋषी सावंत, सिद्धांत लोंढे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा जनार्दन मोटे मॅडम व आभार रत्नमाला सावंत यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *