आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताहाचे उद्घाटन

By : शिवाजी सेलोकर 

वरोरा :

आज जागतिक आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ६ मे २०२४ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे पार पडले.
आज दिनांक ६मे २०२४ ला जागतिक परिचारिका सप्ताहाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात आले होते.डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.म़ंचावर डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ गेडाम स्त्रीरोगतज्ज्ञ,सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेवीका उपस्थित होते.मान्यंवरानी दिपप्रज्वलन करून फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले व परिचारिका बद्दल गौरव ऊदगार काढलें.डाॅ गेडाम यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.आणी परीचारिका यांच्या कार्याचा गौरव केला.वंदना बरडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व हपत्ताभर वीविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात येणार व फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार त्या निमित्ताने करण्यात येणार याची माहिती दिली.यामध्ये
१)दिनांक ७ मे मंगळवार ला वेगवेगळ्या विषयांवर ५ मीनीट वक्तृत्व स्पर्धा
२)८ मे ला डिपार्टमेंट प्रेझेंटेशन व रांगोळी स्पर्धा
३) ९ मे ला डायट डिश काम्पीटेशन
४) १० मे ला बाॅनर पोस्टर स्पर्धा
५) ११मे ला प्रश्न मंजुषा
६) १२ मे ला स्मरनीका चे प्रकाशन ग्यादरिंग व आनंद मेळावा, बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
व्रूशाली देऊडकर यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.सुत्रसंचालंन प्रीयंका दांडेकर अप.यांनी केले व आभारप्रदर्शन प्रदीप गायकवाड अप . यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले.व या कार्यक्रमासाठी सौ संगिता नकले परिसेवीका सौ मिना मोगरे अप. व्रुशाली दहेकर अप .कुंदा मडावी यांनी मेहनत घेतली. सर्व परिसेविका,अधिपरीचारीका व कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *