वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंडेशनचा सत्कार

लोकदर्शन  ÷  मोहन भारती  ===============  ,, ♦️खासदार बाळू धानोरकर यांच्या कडून प्रितेष मत्तेचे कोतुक
गडचांदुर –
ग्रामसंवाद सरपंच संघटना व ताई फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने , कोरोना योद्धा चा ,सत्कार समारंभ व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संघटनाचा सत्कार समारंभ चे आयोजन नुकतेच चंद्रपूर येथे करण्यात आले , उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आशा वर्कर,सरपंच ,सामाजिक संस्था , यांना सन्मानित करण्यात आले ,
कोरपना ,जिवती तालुक्यात सामाजिक व वन्यजीव पर्यावरण संवर्धन , कार्यात अग्रेसर असणाऱ्या वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंडेशन गडचांदुर(वि कॅन फौंडेशन गडचांदुर) यांनी कोरोना काळात केलेल्या जणहित कार्य व संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या , कार्याची दखल घेत
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह (जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर)येथे, सत्कार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले , कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर होते ,विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, गोमतीताई पाचभाई ,(ताई फौंडेशन संस्थापक ) आशीष खुळसंगे जि.प.सदस्य , देवा पाचभाई व इतर मान्यवर उपस्थित होते ,
खासदार,बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ,सन्मान पत्र देऊन
वि कॅन फौंडेशनचे अध्यक्ष प्रितेश मत्ते,व भुषण झाडे यांचा सत्कार करण्यात आला , खासदार धानोरकर व गोमती पाचभाई यांनी प्रितेष मत्तेच्या कार्याचे कोतुक केले, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

वि कॅन फौंडेशनला मागील महिन्यात आरोग्य विभागा तर्फे सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *