रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी उरण नवघरच्या कु. भक्ती विजय भोईर यांची निवड.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 जुलै राजाराम भिकू पाथरे सभागृह पुणे येथे संपन्न झालेल्या स्टेट लेवल किक बॉक्सिंग स्पर्धेत रायगड मधून 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात विजय विकास सामाजिक संस्था एस सी कॉलेज फुंडे कराटे क्लासचे विद्यार्थी भक्ती विजय भोईर हिने नेत्रदीपक यश मिळवत गोल्ड मेडल पटकाविले आहे.तसेच प्रांजल जयकिशन घरत हिने सिल्वर मेडल, तनिष्का नितीन ठाकुर हिने ब्राँझ मेडल आणि स्वरा सुनिल पेडवी हिने ब्राँझ मेडल पटकाविले आहे.या सर्व विदयार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतूक केले आहे.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सदर विदयार्थ्यांचे प्रशिक्षक दिपक घरत तसेच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, विकास भोईर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. विजेते स्पर्धेतील उमेदवारांची निवड रांची (झारखंड) येथे होणा-या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. भक्ती विजय भोईर हिने तिचे वडील तथा इंटरनॅशनल किक बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट विजय भोईर यांच्या पाउलावर पाउल टाकून नेत्रदिपक यश मिळविल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. नवघर गावातील ती प्रथम मुलगी आहे जिने राष्ट्रीय लेव्हलला किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जात आहे व ती याही किक बॉक्सिंग टूर्नामेंट मध्ये बाजी मारेल ही सर्वांची आशा आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *