लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना राष्ट्रवादीतर्फे आटपाडीत अभिवादन !

 

 

लोकदर्शन आटपाडी। 👉 राहुल खरात

दि .५ एप्रिल
लोकराजा छत्रपती शाहु महाराजांच्या स्मृति शताब्दी दिना निमित्त आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात १०० सेकंद स्तब्ध राहून छत्रपती शाहुराजांना अभिवादन करण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, सामाजीक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळे, विठलापूरचे युवा नेते संतोष बाड, युवा नेते रोहीत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता १०० सेकंद मौन बाळगून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन केले . श्रद्धांजली वाहीली . यावेळी छत्रपती शाहु महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *