ऐतिहासिक जुनोना तलावाचे संवर्धन करावे : इको-प्रो * पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

By : Shankar Tadas

चंद्रपूर :

*तलावातील जलपर्णी निर्मूलन करून, तलावाचे सौंदर्य आणि स्थानिकांचे रोजगार प्रश्न सोडविण्याची मागणी

*स्थलांतरित पक्ष्याचे अधिवास सुरक्षित ठेवण्याची गरज

चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि  गोंडराजा कालीन ऐतिहासिक जुनोना तलाव आज संवर्धनाचा प्रतीक्षेत आहे. चंद्रपूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या या तलावाची दुरावस्था झालेली आहे. त्यास कारणीभूत आहे तलावात वाढलेली जलपर्णी वनस्पती. त्यामुळे तलावाच्या सौन्दर्याबाबत प्रश्न निर्माण झालेले आहेत. जागतिक मत्सव्यवसाय दिनानिमित्त जुनोना तलाव संवर्धनासाठी इको-प्रो तर्फे मागणी करीत राज्याचे वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बंडू धोतरे यांनी निवेदन दिले. यावेळी इको-प्रो चे नितिन रामटेके व अन्य सदस्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तलावात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे जलचर संकटात असून मासेमारी करणे अशक्य होत असल्याने स्थानिक रोजगाराची समस्या निर्माण झालेली आहे.

*यंदा स्थलांतरित पक्षी कमी
सदर जुनोना तलाव जंगलव्याप्त असल्याने स्थलांतरित पक्ष्याची मोठी गर्दी होत असे. मात्र तलावात वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावातील जैवविविधता, पक्षी अधिवास संकटात आल्याने स्थलांतरित पक्ष्यानीही पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

*जूनोना तलाव होता सारस पक्षी अधिवास
सदर तलाव जिल्हयात एकमात्र असलेला सारस पक्ष्याचे शेवटचे अधिवास होते. मा. उच्च न्यायालयाच्या ‘सारस पक्षी संवर्धन’ जनहित याचिकेच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शेवटचे ‘सारस’ पक्षी अधिवास असलेला एकमेव जुनोना तलाव आहे. हा तलाव आणि अधिवास संवर्धनाचे कार्य करावयाचे असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने याबाबत आराखडा तयार केलेला आहे. त्याच्या खर्चास मंजुरी प्रदान करणे गरजेचे आहे.

*ऐतिहासिक गोंड़कालीन आहे जूनोना तलाव
गोंड़राणी हितारानी आणि गोंड़राजे खांडक्या बल्लाळशहा यांनी जुनोना तलाव बांधून त्याठिकानी ‘जलमहल’ बांधकाम केले. त्यामुळे या तलाव परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षी या परिसरात युवक- विदयार्थी यांना एकत्रित करून स्वच्छता करिता ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन करण्याचे अभियान राबविले जाते.

*पर्यटनीय महत्वाचा जुनोना तलाव
चंद्रपूर शहरापासून अगदी जवळ असल्याने सुटीच्या दिवशी स्थानिक पर्यटकांना, चंद्रपूरकरांना फिरायला जाण्यास योग्य ठिकाण आहे. तलावाचे नैसर्गिक सौदर्य बाधित झालेले असल्याने अनेकांचा हिरमोड होतो आहे. अत्यंत महत्वपूर्ण असलेला जुनोना तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी इको-प्रोने या निवेदनाद्वारे केली आहे.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *