इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

By : Shankar Tadas
*हिंगोली ते वाशिम भारत जोडो यात्रेत घेतला सहभाग
* पदयात्रेत चालताना पर्यावरण विषयक मुद्द्यावर केली चर्चा
चंद्रपूर :
देशातील अनेक शहरे प्रदूषित होत असून, वायु प्रदूषण, नदी-तलाव जलप्रदूषण यासंदर्भात भविष्यातील धोका टाळण्यासाठी व्यापक उपायोजना, नियोजन करीत आपल्या सभोवताल असलेले ‘जल-जंगल-जमीन’ जैव-विविधता विषयक मुद्दे महत्वाचे असून, विकास साधताना “पर्यावरण व मानव” यांचा विचार सुद्धा केला जाणे तितकेच गरजेचे आहे.
याबाबत सदैव जनजागृती करणारे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेदरम्यान भेट घेतली.
धोत्रे यांनी विविध विषयांवरील सविस्तर निवेदन राहुल गांधी यांना दिले. देशातील प्रदूषण, पर्यावरण, वन्यजीव संवर्धन, त्याचे अधिवास-कॉरिडोर आणि घटते वनक्षेत्र, अधिवास आणि वाढत असलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष समस्या संदर्भात चर्चा केली. देशातील पर्यावरण, निसर्ग, प्रदूषण आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आणि व्यापक धोरण आखण्याची गरज व्यक्त केली.
पदयात्रेच्या माध्यमाने देशभरातील नागरिकांना प्रत्यक्ष जोडून घेत, विविध भागातील समस्या, प्रश्न आणि नागरिकांची विचार समजून घेण्याच्या दॄष्टिने, तसेच देशातील विविधता आणि एकता, बंधुभाव कायम राहावा या दॄष्टिने ही पदयात्रा महत्वाची आहे. देशातील विविध भागातील समस्या, त्याची तीव्रता, नागरिकांची भूमिका याविषयी जाणून घेता येणार आहे. यात पर्यावरण विषयक मुद्दे सुद्धा विचारात घ्यावे, अशी विनंती यावेळी बंडू धोतरे यांनी केली. बंडू धोतरे यांच्यासह इको-प्रोचे सहकारी संदीप जीवने, अब्दुल जावेद व देवनाथ गंडाटे सहभागी झाले होते. महात्मा गांधीच्या तत्त्वावर चालणाऱ्या आणि सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या विदर्भातील सात सामाजिक कार्यकर्त्यांवर “बीइंग द चेंज” हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाची प्रत धोतरे यांनी राहुल गांधी यांना भेट म्हणून दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *