खिर्डीचे उपसरपंचपदी काँग्रेसचे दीपक खेकारे विजयी

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 (प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपना तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. ११) निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मतदान घेण्यात आले. यात दीपक खेकारे यांनी विजय प्राप्त केला.दहा सदस्यीय खिर्डी ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान पार पडले. काँग्रेसचे सरपंचांसह एकूण ७ उमेदवार, शेतकरी संघटनेचे ३ उमेदवार निवडून आले होते. नवनिर्वाचित सरपंच श्यामराव सलाम यांच्या अध्यक्षतेखाली
ग्रामपंचायत खिर्डी कार्यालयात आज उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी काँग्रेसकडून दीपक खेकारे यांनी, तर शेतकरी संघटनेकडून कुमरे यांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. यात खेकारे यांना सात, तर कुमरे यांना तीन मते मिळाली. यावेळ पक्षाकडून गटनेता म्हणून शयमसुंदर पेंदोर यांची नियुक्ती करण्यात आली सर्व ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते,आमदार सुभाष धोटे व इतरांनी नवनिर्वाचित उपसरपंच दीपक खेकारे यांचे अभिनंदन केले आहेत

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *