आमदार सुभाष धोटे यांनी केले मृतक भिमा घुगलोत कुटुंबियांचे सांत्वन : ४ लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा दिनांक १३ नोव्हेंबर २०२२:– राजुरा तालुक्यातील मौजा सुब्बई ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुम्मागुडा येथील शेतकरी भिमा बंडू घुगलोत वय ५५ वर्षे, हा शेतामध्ये जागली वर असताना बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू पावला. घरातील कमावता व्यक्ती मृत्यू पावल्याने घुगलोत कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. आज आमदार सुभाष धोटे यांनी मृतक भिमा घुगलोत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत पावलेल्या कुटुंबास सानुग्रह निधी अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या ४ लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण आ. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. मृतकाची पीडित पत्नी ताराबाई घुगलोत, मुलगा राजेश घुगलोत यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित रक्कम सुध्दा लवकरच शासनाकडून मिळणार असल्याची माहिती दिली.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, वनविभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना स्टार्च, झटका मशीन, आणि जंगलाला कुंपण सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी आपला आग्रह आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत राहू. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघ आणि बिबट्याच्या माध्यमातून भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे वनविभागाने परिसरातील लोकांच्या मदतीने वन्य जीवापासून संरक्षण करावे तसेच हिंस्त्र प्राण्यापासून वाचण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वनविभागाला केल्या.
या प्रसंगी सुब्बई च्या सरपंच सुरेखा आत्राम, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, विरूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, क्षेत्र सहाय्यक गोविंदवार, उपसरपंच रामू राठोड, भाऊजी पा. जाबोर, अजय रेड्डी, प्रवीण चिडे, रघु राठोड, शंकर राठोड, भिम्मया अंगलवार, अभिजीत भुते, धनराज चिंचोलकर, ग्रा प सदस्य रुपेश पवार, मारोती आत्राम, अरुण सोमलकर, दीपक चौधरी, बंडू येलमुले, राहुल बर्लावार, अरुण पर्वतवार, अक्षय अंगलवार, शुभम चौधरी, संजय लखमापुरे, वन कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *