सुरज पवार यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील पाणदिवे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे खजिनदार सुरज पवार यांच्या माध्यमातून कोप्रोली व पाणदिवे येथील अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी महिला पोलिस कर्मचारी ललिता सिंग, अंगणवाडी सेविका श्रीमती कांचन पाटील , जयश्री पाटील, सरिता म्हात्रे, रेश्मा पाटील, अपेक्षा पाटील,करुणा पाटील यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, सल्लागार कुमार ठाकूर, पदाधिकारी – प्रेम म्हात्रे, अभय पाटील, सुविध म्हात्रे , आकाश पवार, रोहन पवार, निलेश पवार, निलेश पवार शुभम ठाकूर,यश पाटील , विक्रांत खारकर यांचीही उपस्थिती यावेळी होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *