चाणजे ग्रुपग्रामपंचायतच्या वतीने सौर पथदिवे.

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 नोव्हेंबर 2022 उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच अमिताभ भगत यांच्या संकल्पनेतून तसेच विद्यमान सदस्य यांच्या सहकार्यातून चाणजे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सर्व स्मशानभूमीजवळ तसेच कोंढरी बाबदेव पाड्यातील बंदर रोडवर सौरपथदिवे लावण्यात आलेत. गावात एखादी वाईट घटना घडल्यानंतर रात्रीच्या वेळेस जर लाईट गेली तर अंत्यसंस्काराच्या वेळेस खूप समस्या निर्माण होत असे.ही समस्या लक्षात घेऊन चाणजेचे विद्यमान सरपंच अमिताभ भगत यांच्या पुढाकारातून व विद्यमान सदस्य यांनी सौरपथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.सौरपथदिवे लावल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *