पनवेल तालुक्यामधील मनसे पक्षाचा झंजावात. भव्य पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 1 नोव्हेंबर 2022महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक तथा पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षातील सर्व नेते मंडळी व आमदार राजू दादा पाटील यांच्या सहकार्याने विविध कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये पक्ष प्रवेश सोहळा व नवीन शाखांचे उदघाटन पनवेल मध्ये मोठ्या दिमाखात करण्यात आले.शाखा उद्घाटनसाठी जितेंद्र भाई पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष,संदेश ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष,दीपक कांबली उपजिल्हाध्यक्ष रायगड,प्रवीण दळवी उपजिल्हाध्यक्ष रायगड,
वर्षा पाचभाई उपजिल्हाध्यक्ष महिला आदिपदाधिकारी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दीपक पाटील उपसरपंच पनवेल,तालुका उपाध्यक्ष दशरथ मुंडे,विभाग अध्यक्ष पोयंजे अक्षय भागित अंजनाताई भागीत ग्रामपंचायत सदस्य ,मोहोपे शाखाध्यक्ष सुरज पवार,नरेंद्र मोकल उप तालुका,आशिष पगडे विभाग अध्यक्ष कर्नाला, नाईकरे अध्यक्ष शाखाध्यक्ष हिल,अल्केश मोकल साई शाखाध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.व तसेच मोठ्या थाटा माटात शाखा उदघाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदुत्व भगवा झेंडा खरोखरच भगवा दिसत होता.शाखा उदघाटनासाठी तालुक्यामधील सर्व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यापुढे देखील अशा जल्लोषाने शाखा प्रत्येक गावोगावी, शहरांमध्ये उदघाटन केला जाईल. सन्माननीय राज साहेबांचा मनसैनिक कोठेही कमी पडता कामा नये असे आश्वासन पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील यांनी दिले.कोणतीही अडचण आली त्या ठिकाणी आम्ही त्या समूहाला सामोरे जाण्याची ताकद ठेवत आहोत. ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत उपसरपंच तसेच महिलावर्ग या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेतला कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार झालेली आहे येणारे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आम्ही सज्ज आहोत आजचा शाखा उद्घाटनचा मनसेचा जल्लोष पाहून विरोधकांनाही घाम फुटला आहे असे रामदास पाटील म्हणाले. नवीन पदनियुक्त्या प्रत्येक शाखे मध्ये करण्यात येत असून शाखाध्यक्ष,उपशाखा अध्यक्ष खजिनदार सचिव या पदनियुक्ती करण्यात आल्या.तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *