कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशीर्वादाने जिनिंग मध्ये शेत मालाची खरेदी ! बळीराजा नागवला जातोय!!

*लोकदर्शन* कोरपना 👉( अशोककुमार भगत )

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारा सारे नियम धब्यावर ठेऊन, प्रशासक व सचिवाच्या संगनमताने शेतकऱ्याची सर्रास लुट होत असलयाचे विदारक वास्तव उजेडात आले आहे.
कोरपना बाजार समिती क्षेत्रात अनेक जिनिंग धारकांनी सोयाबीन खरेदी केल्या बाजार समितीचे शेअर्स बुडवले जात असताना तसेच मोजमाप काटा पासिंग झालेले नाही तसेच राज्यभर दलाली बंद असताना सर्रास दलाली व नेट कॅश च्या नावावर २ % लुट होत आहे.
कोरपना येथे लिलावाचे वेळापत्रक नाही. गडचांदूर कोरपना यार्ड येथे त्यामुळे कोरपना येथे व्यापाऱ्याचा दारात धान्य विक्री होत असताना बघ्याची भूमिका कर्मचारी व सचिव हे पदाधिकारी घेत असून बाजार समितीच्या उत्पन्नाला चुना लावीत आहेत. बाजार समितीने तत्काळ भुई काट्याची व्यवस्था यार्ड वर करावी बाजार समितीचे तत्कालीन सभापती गोडे यांना केली होती.तरी याच्यावर कार्यवाही झालेली नाही.
गतवर्षी व्यापारी काटयात रिमोट चा गैरव्यवहार उघड पडला होता. या चालु हंगामात हजारो क्विटल सोयाबिन खरेदी करून जीनिग धारकांनी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे शेअर्स बुडवले आहे, असा आरोप आहे. हजारो क्विटल सोयाबीन खरेदी विक्री व्यवहार जिनिंग धारकांनी केले असताना बाजार समिती कडे कोणतेही नोंदणी नाही. सदर कोरपना तालुक्यातील कापूस खरेदिचा परवाना आहे परंतु त्यांना तेलबिया व कडधान्याचा परवाना नसून शेतकऱ्याचे थेट सोयाबीन सर्रास जिनिंग वाले खरेदी करत आहे. राज्यात कसल्याही प्रकारची दलाली नसताना व्यापारीच दलाल बनून शेतकऱ्याची लुट करत आहे. सौदा पट्टी न फाडता व्यवहार सुरू आहे हि मोठी गंभीर बाब असून शेतकरी हतबल व अतिवृष्टी पावसाने संकटात असताना शेतकऱ्याची लुट करून जखमेवर मीठ चोळत आहे.यामध्ये बाजार समितीचे साटे लोटे असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लुट होत आहे.यामध्ये बाजार समितीच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. माजी बाजार समितीमध्ये स्वतंत्र काटा लावून शेतकऱ्याची तत्काळ लुट थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
*****************************
आमच्या प्रतिनिधीने प्रशासक व सचिवाशी संपर्क केले असता
प्रशासकांनी मी गर्दी मध्ये असल्याने मी या विषयावर बोलू शकत नाही असे उत्तर दिले. तसेच कवडू देरकर यांनी आम्ही शेतकर्यांना प्रशिद्दी पत्रकाद्वारे शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्ड मध्ये लीलावा मध्ये विक्रीस आणावा असे आव्हान केले आहे तसेच जीनिग मध्ये थेट खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे शेतकर्याची तक्रार प्राप्त झाल्यास वजन व दलाली सबंधात तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाही करू असे सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *