शिवराज्याभिषेक दिना निमित्त वृक्ष बँक नावाची नवीन संकल्पना.

 

लोकदार्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 7 जून शिवराज्याभिषेक दिना निमित्त वृक्ष बँक नावाची नवीन संकल्पना उरण मध्ये प्रथमच अस्तित्वात आली आहे. सुजाता अनिल पारवे(जसखार) आणि अंजली किरण तांडेल(करळ) यांच्या हस्ते या वृक्षारोपणाच्या संकल्पनेच्या नाम फलकांचे अनावरण झाले.नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते कु.महेश सुरेश पाटील यांच्या वतीने ही अनोखी संकल्पना राबविली जात आहे.या संकल्पनेच्या माध्यमाने वृक्षारोपणाची आवड असणाऱ्यांना वृक्ष मोफत देण्याच्या उद्देशाने वृक्ष संकलित केले जाणार आहेत .तसेच ज्यांना वृक्षारोपणाची आवड आहे पण सवड नाही असे सर्व वृक्षप्रेमी आमच्या कडे रोप (वृक्ष) जमा (डिपॉजीट) करू शकतात आणि त्या रोपांच आम्ही आमच्या वतीने वृक्षारोपण करू तसेच जी वृक्ष आमच्याकडे जमा असतील तेच वृक्ष मोफत दिली जातील.असे महेश पाटील यांनी यावेळी सांगितले.अश्या प्रकारे आपण आपली वृक्षारोपणाची आवड जपू शकता ! चला वृक्षारोपनासाठी एकत्र येऊया असे आवाहन महेश यांनी यावेळी केले.विठ्ठल मंदिर नवघर, तालुका उरण येथे हि वृक्ष बँक कार्यरत आहे.येथे वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांना मोफत वृक्ष मिळणार आहेत.यावेळी नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते एम डी भोईर, नितेश पाटील,हर्षल दीपक भोईर, दक्षता अनिल पारवे, दर्श किरन तांडेल ,हेमंत बंडा व मित्र परिवार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *