उरण पुर्वविभाग मच्छिमार संघटनेच्या अध्यक्ष पदी कांचन कोळी.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 22.डिसेंबर 2022 उरण,आवरे, गोवठणे, पाले, कोप्रोली , खोपटे, भेंडखळ, नवघर, कुंडेगाव, मोठी जुई, बोरखार, टाकीगाव,दिघोडे येथील पारंपारीक मच्छीमारांची सभा बुधवार दि. 21/12/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता खोपटा इसार जेट्टी येथे संपन्न झाली.या सभेस गुरुप्रसाद म्हात्रे (चेअरमन कडापे मच्छिमार सोसायटी ),श्रीराम पाटील (चेअरमन गोवठने मच्छिमार सोसायटी),यशवंत नाखवा (चेअरमन शितला देवी मच्छिमार सोसायटी),सामाजीक कायकर्ते रवि पाटील नवघर, नवघर कुंडेगाव ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी ,सामाजिक कार्यकर्ते हसुराम घरत,सामाजीक कार्यकर्ते मनोहर कोळी,प्रधान कोळी,दिघोडे येथील सामाजिक कार्यकर्ते व बहुसंख्य मच्छिमार उपस्थित होते.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष कांचन कोळी, हसुराम घरत (सेक्रेटरी), उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे, खजिनदार गोकुळ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.सर्वानुमते निवड झाल्याने या नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *