महात्मा गांधी विद्यालयात कर्करोग जनजागृती कार्यक्रम संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅली ने शहर दुमदुमले

 

लोकंदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर, भारत स्काऊट गाईड चंद्रपूर ,व महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालयात कर्करोग जनजागृती कार्यक्रम चे आयोजन 23 सप्टेंबर ला करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे,होते,प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयात गडचांदूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय घाटे,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चापले ,प्राचार्या स्मिताताई चिताडे,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष श्रीधर काळे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे ,पर्यवेक्षक एच बी मस्की होते,
डॉ संजय घाटे यांनी कर्करोग चे प्रकार, लक्षणे,प्रतिबंधात्मक उपाय, यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली,
डॉ स्वप्नील टेम्भे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी तंबाखू, खर्रा न खाण्याचे आवाहन केले,तसेच आरोग्य विषयक शासकीय योजनांची माहिती दिली.
प्राचार्या स्मिताताई चिताडे,यानी शासनाच्या आरोग्य संबंधित विविध प्रकारच्या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले,मुख्याध्यापक चापले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले, याप्रसंगी 10 वी 12 वी मध्ये तालुक्यातुन प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार जिल्हा मुख्याध्यापक संघ च्या वतीने करण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षक एच बी मस्की यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाधव यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅली ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्निल टेम्भे यांनी हिरवी झेंडी दाखवली, शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत घोषणा देत रॅली शाळेत विसर्जित झाली,रॅली मध्ये विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर,मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रॅली च्या यशस्वीते साठी पोलीस विभागाचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *