गोरख ठाकूर यांच्या माध्यमातून उरण मध्ये कपील पाटील फॉउंडेशन वैद्यकीय मदत कक्ष सुरु. नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन.

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 25 सप्टेंबर
कपिल पाटील फाऊंडेशन वैद्यकीय मदत कक्ष हे ना. कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री -पंचायती राज,भारत सरकार यांच्या सहकार्यातून कार्यरत असून कपिल पाटील फाऊंडेशन मदत कक्षातून सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील आणि निर्धन रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन केले जाते.ही मदत फक्त गंभीर आजार आणि शस्त्रक्रीयांसाठी आहे.

हृदयरोग आणि हृदयरोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हृदयाला असलेले छिद्र आणि संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे कर्करोग, जन्मतः कर्णबधिर मुलांचे कोकलियर इम्पलां, किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट या सारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी गोरगरीब रुग्णांना धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध ट्रस्टद्वारे गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कपील पाटील फॉउंडेशन वैद्यकीय मदत कक्ष ही समन्वयाची भूमिका पार पाडत असते. आजपर्यंत अनेक शेकडो रुग्णांना या वैद्यकीय मदत कक्षाने मदतीचा हात दिला आहे. अनेक लोकांचे यामुळे प्राण वाचले आहेत.हे वैद्यकीय मदत कक्ष अगोदर खासदार कपील पाटील यांच्या मतदार संघा पुरता मर्यादित होती.आता मात्र उरण मधील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर(खोपटे )यांच्या प्रयत्नामुळे ती सेवा आता उरण मध्ये सुद्धा मिळणार आहे.उरण मधील रुग्णांनी, गरजू नागरिकांनी या वैद्यकीय मदत कक्ष व वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गोरख ठाकूर (खोपटे )फोन नंबर – 97025 35169 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

गोरगरीब रुग्णांना मदतीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:-

१) आधारकार्ड (झेरॉक्स)

२) रेशनकार्ड – पिवळ्या किंवा केशरी रंगाचे ( झेरॉक्स) पांढरे रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

३) तहसीलदार प्रमाणित उत्पन्नाचा दाखला. (झेरॉक्स) (वार्षिक उत्पन्न १ लाखांच्या आत असणे आवश्यक आहे.)

४) हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाजपत्रक (कोटेशन) हॉस्पिटलचे कोटेशन ओरिजिनलच लागेल.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *