गडचांदूर हद्दीतील अवैध पार्किंग कायमस्वरूपी बंद करा* *विक्रम येरणे* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र असून अंतराष्ट्रीय स्तराचे मोठे सिमेंट कारखाने आणि कोळसा खाणी साठी परिसरातील व्यापारी केंद्र सुद्धा आहे. शहरा जवळ अमल नाला धरण, माणिकगड किल्ला, पुरातन लंगडा मारोती हनुमान मंदिर आणि बुद्धभूमी असे महत्वाचे पर्यटन स्थळ स्थित आहेत. शहरात माणिकगड सिमेंट कंपनी असल्याने वाहनाची मोठी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ही राष्ट्रीय महामार्ग ३५३ आणि राजीव गांधी चौक ते संताजी जगनाडे महाराज चौक व थुटरा रोड वर वाहने अवैधपणे पार्क केली जात असतात.या समस्येवर आधी सुद्धा बरेच दा तक्रार केली असता पोलीस विभागातर्फे तात्पुरती कारवाई केली जाते परंतु काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे अशी होत असते २०१५ मध्ये या बाबत तक्रार केली असता पोलीस विभागाने लेखी आश्वासन दिले पुढे माननीय उपविभागीय अधिकारी यांनी माणिकगड सिमेंट ला हि सूचना केली की अवैध वाहन पार्क करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी कंपनी ने चर्चा करून पुढे जर ते न एकता वाहने पार्क करीत असल्याचे आढळल्यास ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यावसायिक करार रद्द करण्याची कारवाई माणिकगड सिमेंट कंपनी ने करावी तरीही काही सुधार झाला नाही. त्या नंतर तत्कालीन नगर परिषद ने शहरातील प्रमुख मार्ग नो पार्किंग झोन करण्याबाबत ठराव घेऊन जिल्हास्तरीय रस्ता समिती कडे प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव मंजूर होऊन काही दिवस नो पार्किंग चे फलक लावण्यात आले परंतु आता पुन्हा अवैध पार्किंग ने डोके वर काढलेले असून अवैध पार्किंग मुळे अपघात होऊन लोकांचे बळी जात आहेत एका आदिवासी युवकाचा मृत्यू अवैध पार्किंग मुळे नुकताच झालेला आहे,

माणिकगड सिमेंट कंपनी ची स्वतः ची ४५० ट्रक क्षमतेची वाहन पार्किंग व्यवस्था असून त्यात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहन पार्क करण्याची व्यवस्था असल्याचे त्यांच्या शासनाकडे सादर केलेल्या प्रकल्प अहवाल प्रस्तावात नमूद आहे. तरीही कंपनीत येणारी जाणारी अवजड वाहने ही अवैधपणे शहरातील प्रमुख मार्गांवर पार्क केली जातात. या बाबत माणिकगड कंपनी आणि पोलीस प्रशासन हे नेहमीच एकमेकांकळे बोट दाखवून वेळ मारून नेतात. अवैध पार्किंग निदर्शनास आणून दिल्यास थातूर मातूर कारवाई केली जाते परंतु कायम स्वरूपी पार्किंग बंद होत नाही या समस्येवर काही दिवसांपूर्वी तक्रार केली असता खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी RTO यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

शहरात सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचे बांधकाम सुरु असून आधीच लोकांना वाहतुकीस त्रास होत असताना सदर अवैध पार्किंग मुळे अपघातात वाढ झालेली आहे.
गडचांदूर शहर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ३५३ आणि राजीव गांधी चौक ते संताजी जगनाडे महाराज चौक व थुटरा रोड वरील अवैध पार्किंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावी सोबतच अवैध पार्किंग पुन्हा सुरु झाल्यास जवाबदारी निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी गडचांदूर नगर परिषद चे सभापती विक्रम येरने यांनी वारिष्ठकडे केली आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *