लोकदर्शन 👉 प्रतिनिधि
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कार्तिकी एकादशी निमित्त गडचांदूर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हभप दिपक महाराज पुरी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी दीपक महाराज पुरी यांनी कार्तिकी एकादशी चे महत्व भाविकांना पटवून दिले आणि सर्वांनी साधू संतांनी दाखविलेला मार्ग पत्करावा असे सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी सुध्दा उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव मुसळे यांनी केले. यापसंगी भाविक पुरुष, महिला मोठया संख्येनी उपस्थित होत्या.




