भारतीय संविधान पुस्तकाचे पूजन करून उरण नगर परिषद वाचनालयात संविधान दिन साजरा.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे )

उरण दि 26 नोव्हेंबर 2022 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिना निमित्त उरण मध्ये विविध संस्था, संघटना तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उरण शहरात विमला तलावा शेजारी असलेल्या उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयमध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटना पुस्तकाचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उरण नगर परिषदेचे माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयचे कर्मचारी जयेश वत्सराज, अभिषेक कोळी, मेघना कोळी,इम्रान खान, देविना मुंबईकर, संजय म्हात्रे, दादाराम कळकुंबे, बळीराम कोळी, शुभम गौडदाब आदी वाचक वर्ग, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *