महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे व्याख्यानमाला चे आयोजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शनिवारी इतिहास अभ्यास मंडळ,च्या वतीने स्पर्धा परीक्षेत इतिहास विषयाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्य अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, मार्गदर्शक म्हणून शरद पवार महाविद्याल,गडचांदूर येथील इतिहास विषयाचे विभाग प्रमुख प्रा डॉ शरद बेलोरकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मध्ये इतिहास विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून विस्तृतपणे मार्गदर्शन केले,
प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे,प्रा प्रफुल्ल माहुरे,प्रा नंदा भोयर, प्रा प्रदीप परसुटकर,प्रा आशिष देरकर, प्रा सचिन भैसारे, होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले संचालन प्रा सुधीर थिपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा चेतना कामडी यांनी केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *