नांदा फाटा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन ,,,,,,,,,,,,,,, ♦️तालुक्यातील 30 संघाचा सहभाग आदर्श किसान विद्यालयाने मारली बाजी


,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉(प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोरपणा तालुका क्रीडा समितीच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये माउंट पब्लिक स्कूल नांदा फाटा येथे शनिवारी पार पडले उद्घाटनीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी म्हणून नांदा च्या नवनिर्वाचित सरपंच मेघा नरेश पेंदोर होत्या, उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सचिन कुमार मालवी यांच्या हस्ते करण्यात आले विशेष अतिथी म्हणून उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, यजमान शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा चव्हाण, संस्था अध्यक्ष सूर्यनारायण रेड्डी, संजय कुमार बुरघाटे मंचावर उपस्थित होते ,
14 ,17 व 19 वर्षाखालील मुला मुलींचे कबड्डीचे सामने संपूर्ण दिवसभर पार पडले ज्यामध्ये प्राथमिक गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थुटरा ,मुलींच्या गटामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयेगाव, यांनी बाजी मारली तर 17 व 19 मुलांच्या गटामध्ये आदर्श किसान विद्यालय नारंडा यांनी अजिंक्य पद प्राप्त केले कोरपणा तालुक्यातील एकूण 30 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला स्पर्धेच्या उद्घाटनिय सोहळ्याच्या सुरुवातीला यजमान शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत व नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली, तालुक्यातील लखमापूर, गाडेगाव, भोयेगाव ,गडचांदूर, अंबुजा निकेतन उपरवाही, नांदा ,नारंडा, अंतरगाव, आवाळपुर, येथील विविध शाळांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला, स्पर्धेच्या यशस्वी ते करिता कोरपणा तालुका क्रीडा सचिव प्रमोद वाघाडे, क्रीडा शिक्षक रमेश वासेकर गुलाब खामनकर, श्रीकांत ठावरी,बबन भोयर, संजय झाडे नंदकिशोर खिरटकर, माकोडे, राहुल पाचभाई ,योगेश मुळे, रवी चिंचोलकर, सुरज पानघाटे, हरीश खंडाळे ,प्रफुल बुडाले, आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता सर्व विजयी संघांना शुभेच्छा देण्यात आल्या

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *