महात्मा गांधी विद्यालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय ,उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार,होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते,
सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
प्रा,सुधीर थिपे यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन चारित्र्य वर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन प्रा आरजू आगलावे,यांनी केले तर आभार प्रदर्शन देवराव कुळमेथें यांनी केले, याप्रसंगी दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदा भोयर,तथा इतर सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *