Home
Home Breaking News इन्फंट कान्व्हेंट चे विद्यार्थी बुद्धीबळ स्पर्धेत विजयी.

इन्फंट कान्व्हेंट चे विद्यार्थी बुद्धीबळ स्पर्धेत विजयी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत विजय संपादित केला. यात अंडर फोर्टीन गटातून आर्यन येरणे, ऋत्विका सदामअल्ला, प्रींन्स बराज, अंडर सेवंटिन गटातून परिक्षित पारखी, अखिल यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळविले आहे. या सर्व विजयी स्पर्धकांची पुढे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, सुभाष पिंपळकर, विष्णू गेडाम यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तर पुढे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here