इन्फंट कान्व्हेंट येथे बालकदिन उत्साहात साजरा.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे बालकदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शिक्षक शिक्षकांनी शाळेची प्रार्थना सभा घेतली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकांनी गीत, नृत्य, सामुहीक नाटक यांचे सादरीकरण केले. बालकदिनानिमित्य शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नसीम मॅडम, शुक्ला मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विशेष करून विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राम सर यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *