*जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या उपसरपंचपदी आशिष देरकर अविरोध*

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना – १२ सदस्यीय जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या उपसरपंचपदी आशिष देरकर अविरोध निवडून आले आहे.
१६ ऑक्टोबर २०२२ ला ग्रामपंचायत बिबीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात स्मार्ट व्हिलेज पॅनलचे सरपंचासह एकूण १० उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. भाजपचे २ उमेदवार निवडून आले होते. नवनिर्वाचीत सरपंच माधुरी टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली (आज दि.११) ला ग्रामपंचायत बिबी कार्यालयात पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एकच अर्ज असल्याने आशिष देरकर यांची अविरोध निवड करण्यात आली.
निरीक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांच्यासह नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष देरकर यांना उपसरपंच म्हणून काम करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *