



लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित विविध परीक्षा संबंधित कामकाजामध्ये विध्यापिठाच्या परिक्षेत्रातील कार्यरत विविध महाविद्यालयातील शिक्षक वर्ग नियमित सहभागी होत असून परोक्षक, पेपर सेटिंग, पेपर मॉडेरेशन व पेपर मूल्यांकन यासारखे महत्त्वपूर्ण काम करीत असतात.हे कार्य मेहनतीचे व अभ्यासपूर्ण असून सदर कार्य पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ नियमानुसार संबंधित कामाचे मानधन प्राप्त होणे अपेक्षित आहे मात्र सन 2018 -19 पासून अनेक प्राध्यापकांचे परीक्षक, पेपर सेटिंग, पेपर मॉडरेशनमानधन विद्यापीठ स्तरावर अजूनही प्रलंबित असल्याने गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या वतीने कुलगुरू महोदयांना निवेदन देण्यात आले आहे
या आधी मागील सत्रात संघटनेने वरील उपरोक्त प्रश्नाबाबत निवेदन दिले होते व या प्रश्नाबद्दल मागणी केली असता कुलगुरू महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती व अनेक वर्षांपासून प्रलंबित अनेक प्राध्यापकांचे परीक्षा संबंधित कामाचे मानधन वितरित केले गेले त्यावेळी विद्यापीठाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले होते मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे असून अजूनही अनेक प्राध्यापकाचे मानधन 2018-19 सत्रा पासून प्रलंबित आहे. करिता यासंबंधी संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांना निवेदन देऊन परीक्षा संबंधी कामाचे प्रलंबित मानधन त्वरित वितरित करण्याची पुनश्च मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात कुलगुरू महोदयांनी त्वरित त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या शिष्टमंडळासमोर बोलावून प्रश्न बाबत खातर जमा करून घेतली व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता द्या व अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्राध्यापकांच्या परीक्षा संबंधीचे मानधन प्रश्न त्वरित निकाली काढा असे त्यांनी अधिकाऱ्यांना संघटनेच्या शिष्टमंडळासमोर आदेश दिले आहे. या प्रसंगी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोरलावार सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, विभाग समन्वयक डॉ. दिनकर चौधरी, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ.संजय फुलझले, प्रसिद्ध प्रमुख प्रा. प्रफुल शेंडे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.